क्षेत्रसभा, शहर विद्रुपीकरण, संकल्पना फलक, अनधिकृत बांधकामांच्या मुद्यांवर संघर्ष चालू राहणार

इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप आणी स्वयंसेवी संस्थांचा पत्रकार परिषदेत निर्धार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : क्षेत्रसभा, शहर विद्रुपीकरण, संकल्पना फलक, अनधिकृत बांधकामांच्या मुद्यांवर पुणे महानगरपालिका पातळीवर पाठपुरावा आणि संघर्ष चालू राहणार असल्याची भूमिका इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अस्लम बागवान यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

पालिकेशी संबंधित विविध मागण्यांसंदर्भात बागवान यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर २१ सप्टेबरपासून उपोषण केले होते. ठोस लेखी आश्वासन मिळाल्यावर त्यांनी ते स्थगित केले होते.पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी संघर्षाची दिशा स्पष्ट केली. यावेळी इब्राहिम खान, अजिंक्य जगदाळे, सिध्दार्थ गायकवाड, दत्ता पाकिरे, सचिन आल्हाट, समीर मुल्ला हे उपस्थित होते.

इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी दिनांक 21/09/21 रोजी ते 28/9/21 रोजी क्षेत्रसभा घेण्यासंदर्भात बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणाआधी वर्षभर समक्ष हजर राहुन अर्ज, ईमेल तसेच माहिती अधिकार याचा वापर करून सतत विविध नागरी समस्या याचा पाठपुरावा केला. त्यानंतर धरणे आंदोलन, स्मरण आंदोलन, ठिय्या आंदोलन आणि गुलाबपुष्प देऊन पुणे मनपा अधिकाऱ्यांच्या निकृष्ठ कार्याचा गांधीगिरी मार्गाने निषेध करूनहि प्रशासन दखल घेत नाही, हे पाहून शेवटी आमरण उपोषण करण्यात आले.

अस्लम बागवान म्हणाले, की महाराष्ट्र म्युनिसिपल अधिनियम 1949 च्या कलम 29/क/2/1 नुसार दोन वर्षात क्षेत्रसभा न घेणार्‍या दोषी नगरसेवक प्रभाग क्रमांक 27 चे अनुक्रमे अ ब क ड मधील नगरसेवकांना बडतर्फ करण्यात यावे. शहराच्या उपनगरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर रोख लावणे. संकल्पना फलके कोणाच्या आणि कुठल्या तरतुदीने शहरभर लावली जातात याचा ठराव मिळावा, शहर विद्रुपीकरण तसेच आकाशचिन्ह, पथ, उद्यान याचा महसूल बुडविणे, पुणे मनपाच्या विद्युत विभागाची करोडो रूपयांची विज चोरी मधील दोषी नगरसेवक गफुर अहमद पठाण (प्रभाग 27) यावर गुन्हा दाखल करावा,नगरसेवकांना मिळालेल्या वॉर्डस्तरीय निधीचा हिशोब , आलेल्या टेंडर व खर्च झालेल्या पैशाचा हिशेब मिळावा,या मागण्या पालिकेकडे केल्या आहेत.

या मुद्यावर उपोषण केले असता ते स्थगित करण्यासाठी पुणे मनपाच्या निवडणूक शाखेचे उपायुक्त यांच्या माध्यमातून क्षेत्रसभा घेण्यास मंजूर असल्याचे तसेच उर्वरित मुद्यावर आयुक्तांसमोर आठ दिवसात चर्चेच्या आश्वासन पत्रानुसार उपोषण स्थगित करण्यात आले. १४ ऑक्टोबर रोजी बागवान यांच्या कार्यक्षेत्रात क्षेत्रसभा घेण्याचे पालिकेने सुचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here