सिमला येथे अतिपावसाने डोंगरावर बांधलेली ७ मजली इमारत कोसळली; व्हिडीओ व्हायरल

सिमला (हिमाचल प्रदेश) : येथील इमारत कोसळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. या गुरुवारी संध्याकाळी एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे.

शिमल्यातील कच्ची खोऱ्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे इतर इमारतींना धोका निर्माण झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितलं की, ही घटना शिमल्यातील हाली पॅलेसजवळ घोडा चौकी येथे संध्याकाळी ५.४५ वाजता घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

या घटनेनंतर नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाजही घटनास्थळी पोहोचले. त्याने नुकसानीचा आढावा घेतला आहे आणि सर्व शक्य मदत करणार असल्याचं सांगितलं. असं सांगितलं जात आहे की, लोक इमारत कोसळण्यापूर्वी बाहेर पडले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक उंच इमारत केवळ ६-७ सेकंदात कशी कोसळतेय हे दिसून येतंय. असं म्हटलं जात आहे की, कोसळलेली इमारत सात मजली होती आणि भूस्खलनामुळे इमारतीला तडे गेले होते.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here