मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना भरधाव वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू

मलकापूर (प्रतिनिधी) : बुलढाणा मलकापूर रस्त्यावर डिडोळा फाट्यानजीक शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मार्निंग वॉकला गेलेल्या तिघांना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

लष्करात भरती होण्याचे ध्येय बाळगून अमोल निनाजी गाढे ( वय २०), कमलेश शिवाजी जुनारे (वय २०) हे दोघे दररोज मार्निग वॉक आणि रनिंगसाठी जात होते. तर त्यांच्यासोबत दिपक रामनाथ कायस्थ (वय ४५) हेदेखील जात होते. शुक्रवारी पहाटे ते तिघे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता बुलढाणाकडून मलकापूरकडे जाणार्‍या अज्ञात भरधाव वाहनाने तिघांना धडक दिली.

या अपघातात दिपक रामनाथ कायस्थ आणि अमोल निनाजी गाढे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कमलेश शिवाजी जुनारे याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर वाहनासह वाहनचालक पसार झाला आहे. टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे आरोपीचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती बोराखेडी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here