ड्राइव इन लसीकरण मोहीम केंद्रास नंदा फाउंडेशनची भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी स्वप्निल राणी नंदकुमार) : गोरेगाव, मुंबई स्थित मुंबई महानगरपालिका द्वारा आयोजित ड्राइव इन लसीकरण मोहीम केंद्रास नंदा फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष श्री स्वप्नील राणी नंदकुमार यांनी भेट दिली. शारदीय नवरात्रौत्सव प्रसंगी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय सहाय्यक यांना त्यांच्याच कार्य स्थळी भेट देऊन सन्मानपत्र द्वारा गौरविणे हे त्या मागचे प्रयोजन होते.

अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने कोणतीही वाहतुकीची समस्या उदभवू न देता, सहज सोप्या पद्धतीने सदर ड्राइव्ह इन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्रामध्ये कार्यरत डॉ. समी मुल्ला व सहाय्यक सुनिता सरगर, स्वप्नील मोरे, नीलम गांगोडे, सोनल बुरंगे इत्यादी व्यक्तींना वेदनंदा सन्मानपत्र द्वारा गौरविण्यात आले.

खुलेपणाने नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या मागे अशा वैद्यकीय सहाय्यक व्यक्तींचा अदृश्य हातभार आहे अन् त्यांचा या पवित्र दिवसात स्मरण ठेऊन सत्कार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन स्वप्निल राणी नंदकुमार यांनी याप्रसंगी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here