मैंदर्गी येथे ओम शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे रक्तदान व कोविड लसीकरण शिबीर

अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : मैंदर्गी येथील ओम शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्री निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या शिबिरात १३० जणांनी रक्तदान केले व कोविड लसीकरणात २०१जणांनी लसीकरण करून घेतले.

महात्मा गांधी चौकातील सिंदगी वाड्यात हे शिबीर पार पडले प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन शिवचलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन.हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव रेवनसिद्ध पट्टदेवरू महास्वामीजी होते.

maidargi-blood-donataion-camp

या वेळी दुधनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,गटनेते किरण केसुर, राजशेखर पडसलगी,डॉ. उदयकुमार म्हेत्रे,मंडळांचे अध्यक्ष सुरेश नागुर, उपाध्यक्ष सिद्धाराम जकापुरे व सर्व मंडळ पदाधिकारी आदी उपस्थित होते व तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम,शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण असे उपक्रम पार पडले. कोरोनाचे सर्व नियम पाळत हे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here