बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : येथील देशी दारु विक्रेत्याची मनमानी सुरु असून, गरीब वस्तीतील ग्राहकांना जास्त किंमतीत दारु विकून जास्त नफा कमवत आहे
गाव व परिसरातील तीस ते पस्तीस खेड्यातील देशी दारु सेवन करणारे या देशी दारु दुकानात येतात. मात्र वाढीव किंमत लावून हा दुकानदार या नागरिकांना वेठीस धरत आहे. राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने देशी दारु दुकानदारांना देशी दारु विक्रीचे दर ५५ रुपये ठरवून दिले असतांनादेखील हा देशी दारु विक्रेता सर्व नियम धाब्यावर ठेवून आपल्या मनमानीनुसार ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दरात म्हणजे ८० ते ९० रुपयांना विकून, ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहे.
सदरील देशी दारूचे दुकान मालकाने राज्य उत्पादन शुल्कच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करुन महिन्याकाठी लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण सुरु असल्याने, तेरी भी चूप अन् मेरी भी चूप अशी परिस्थिती असल्याचे समजते. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या देशी दारु दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.






