छत्तीसगड (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील जशपूरमध्ये रस्त्यावरून जात असलेल्या एका दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीत कार घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. कार अचानक मिरवणुकीत घुसल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. उपस्थित लोक संतापल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. उपस्थितांनी लोकांना चिरडणारी कार पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकासह दोघांना अटक केली.
छत्तीसगडच्या जशपूरमध्ये दुर्गा मातेच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाली होती. त्यात १०० ते १५० जणांचा सहभाग होता. तितक्यात मागून एक कार भरधाव वेगाने आली आणि तिने मिरवणुकीतील अनेकांना धडक दिली. लोकांना चिरडत कार पुढे निघून गेली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
A speeding vehicle runs over a Hindu religious procession in Jashpur, Chattisgarh, without any provocation whatsoever.
This is second such instance of communal profiling and assault on Hindus while CM @bhupeshbaghel is busy helping the Gandhi siblings find political ground in UP. pic.twitter.com/olheUNVPgG— Amit Malviya (@amitmalviya) October 15, 2021
बबलू विश्वकर्मा असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे वय २१ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या सिंगरौलीचा रहिवासी आहे. तर दुसर्या आरोपीचे नाव शिलुपाल साहू असे आहे. त्याचे वय २६ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या बबरगवा जिल्ह्याचा रहिवासी आहे.
प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, दोन्ही आरोपींनी या प्रवासादरम्यान आधी कुणाला तरी उडवले होते. काही लोक त्याचा पाठलाग करत होते आणि त्यामुळेच गाडीचा वेग खूप जास्त होता. मात्र, यापूर्वी या दोन आरोपींनी ज्या कारला चिरडले होते, त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दोन्ही आरोपी लोकांना चिरडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सुमारे ५ किमीपर्यंत कारचा पाठलाग केला. त्यानंतर सुखरापारा येथे कार चालकाला पकडून त्यांना जबर मारहाण केली. तसंच संतापलेल्या लोकांनी कारला आग लावली. आरोपींना जमावापासून वाचवण्यासाठी स्थानिक पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. जमावापासून वाचवताना पोलिसांनी आरोपींना रायगड जिल्ह्यातील कापु पोलीस ठाण्यात आणले आहे. लोकांचा रोष पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






