भोपाळ (मध्यप्रदेश) : येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विविध व्याधींनी घेरले असले तरी जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा त्या खेळाच्या मैदानात उतरलेल्या पाहायला मिळतात, काही महिन्यांपूर्वी त्या बास्केटबॉल खेळताना कोर्टवर दिसल्या होत्या. बुधवारी त्या कबड्डीच्या मैदानात उतरलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने साध्वी प्रज्ञा संतापल्या आहेत. व्हिडीओ चित्रीत करणाऱ्याला त्यांनी ‘रावण’ म्हटलं आहे. रेकॉर्डीग करणाऱ्याची म्हातारपणी आणि पुढच्या जन्मी वाट लागेल असा शापही त्यांनी दिला आहे.
BJP MP Pragya Singh Thakur, who was confined to a wheelchair for a long time and had obtained bail in 2008 Malegaon blast case on medical grounds, termed the one who shot a video showing her playing kabaddi, 'Ravana'; said his old age, next birth will get spoiled
— Press Trust of India (@PTI_News) October 16, 2021
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या नवरात्रीमध्ये गरबा खेळताना दिसल्या होत्या. त्यापूर्वी जुलै महिन्यात त्यांनी बास्केटबॉल खेळला होता. ग्राऊंडवर सराव करत असलेल्या खेळाडूंना पाहून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. त्या बास्केटबॉल कोर्टवर उतरल्या आणि त्यांनी ड्रिबलिंगही केलं. त्यांचा हा व्हिडीओ पाहून काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी म्हटलं होतं की ‘आजपर्यंत व्हीलचेअरवर पाहिलं होतं, आता स्टेडीअममध्ये बास्केटबॉल खेळतानाही पाहिल्याने आनंद झाला आहे. ‘ साध्वी प्रज्ञा यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, तसेच इतर व्याधींनीही त्यांना गाठले आहे. यामुळे त्यांना चालण्याचा त्रास होतो अशी त्यांची तक्रार असते.






