लायन्स क्‍लब ऑफ सातारा एमआयडीसीच्यावतीने नऊ महिलांचा नवदुर्गा ॲवॉर्डने सन्मान

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या नऊ महिलांचा लायन्स क्‍लब ऑफ सातारा एमआयडीसीच्यावतीने ‘नवदुर्गा ॲवॉर्ड २०२१’ने कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर येथे सन्मान करण्यात आला.



सातारा पोस्ट ऑफिसच्या सीनियर सुपरिडेंटेंट श्रीमती अपराजिता मिर्धा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. लायन्स क्‍लब ऑफ सातारा एमआयडीसीचे अध्यक्ष आनंदा गायकवाड अध्यक्षस्थानी होते. रिजनल चेअरमन शिवाजीराव फडतरे, सेक्रेटरी डी. वाय. पाटील, झोनल चेअरमन महेंद्र कदम, कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक बी. एस. सावंत, लायन्स क्‍लब ऑफ सातारा एमआयडीसीचे उपाध्यक्ष बाळासाहेब महामूलकर, ट्रेझरर कुलदीप मोहिते, किशोर शेंडे, लायन्स क्‍लब युनायटेडचे अनिल कदम, लायन्स क्‍लब सह्याद्रीचे सचिन काळे, कांबळे उपस्थित होते. शिवाजीराव फडतरे, अपराजिता मिर्धा यांनी मनोगत व्यक्त केले.



सत्कारमूर्ती नवदुर्गांनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले. एमजेएफ लायन धैर्यशील भोसले व एमजेएफ लायन राजेंद्रकुमार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीकांत तोडकर, सचिन साळुंखे यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला. क्‍लबच्या नवदुर्गा कीर्ती तोडकर व वृषाली गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती मोहिते यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आनंदा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here