गॅस स्फोटात जखमी अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

कबनूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : येथील दत्तनगर परिसरातील एका घरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसची गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी असलेल्या अंगणवाडी सेविका कांचन स्वामी (वय वर्षे ३५) या महिलेचा रविवारी सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात नवरा, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कबनूर तालुका हातकणंगले येथील दत्तनगर गल्ली नंबर ११ मध्ये राहणाऱ्या कांचन संजय स्वामी या एकात्मिक बाल विकास प्रकल्प हातकणंगले प्रकल्प दोनमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहेत. त्या मुलांच्या सह सिद्रा या नरसप्पा अथणी यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. कांचन संजय स्वामी या एकात्मिक बाल विकास प्रकल्प हातकणंगले प्रकल्प दोनमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहेत.

बुधवारी पहाटे फिरायला गेल्या होत्या. त्या फिरून आल्यानंतर त्या स्नानासाठी पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटविताना आकस्मिकपणे गॅसचा मोठा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने इचलकरंजी येथील आयजीएममध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

पाचव्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्फोट झाल्यानंतर घराच्या भितींना तडे जावून छताचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. घरासह प्रापंचिक साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here