गँगस्टर सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये ताब्यात; प्रत्यार्पणाची तयारी सुरु

नवी दिल्ली : गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा २००७ पासून अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पुजारीच्या शोधात होती. गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती.



फिलिपिन्सचे वृत्तपत्र मनिला बुलेटिननुसार, ४८ वर्षीय पुजारीला परुनाक शहरातील एका निवासी इमारतीतून ब्युरो ऑफ इमिग्रेशनने अटक केली. तो फिलिपिन्समध्ये बेकायदेशीरपणे राहत होता आणि त्याला बाहेर काढण्यात येणार होते. पुजारीला अमेरिकेनं फरार गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे त्याचं फिलिपिन्समधून अमेरिकेत प्रत्यार्पण केलं जाण्याची शक्यता आहे.


मुंबई पोलिसांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली नसली तरी, ठाण्यात पुजारीविरोधात खंडणीचे किमान २३ गुन्हे दाखल आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. पुजारीविरोधात लुकआऊट नोटीस आणि इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी सुरेश पुजारीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुजारीविरोधात सर्वाधिक वसुली आणि खंडणीचे गुन्हे ठाण्यामध्येच जास्त नोंदवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here