झी मराठी पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री कतरिनाला पैठणी भेट

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : महाराष्ट्राचं महावस्त्र ‘पैठणी’ देऊन आदेश बांदेकर यांनी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाद्वारे गेली १७ वर्षे तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी’ मराठी अवॉर्डस्मध्ये बांदेकर भावोजींनी चक्क अभिनेत्री कतरिना कैफ हिचा पैठणी देऊन सन्मान केला.

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. त्यावेळी भावोजींनी कतरिनाचं स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत, महाराष्ट्राचं महावस्त्र तिला भेट देऊन केलं. इतका मोठा सन्मान दिल्याने कतरिनादेखील भारावून गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंदच सगळं काही सांगून जातो. हा सोहळा प्रेक्षकांना 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘झी’ मराठीवर पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here