जामनेर (प्रतिनिधी) : कोरोना कालावधीत महिलांनी बचत गटांकडून घेतलेले कर्ज शासनाने माफ करावे यासाठी गेल्या १० दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला उपोषणास बसलेल्या आहेत.
महिलांच्या या आंदोलनाला आज छावा संघटनेमार्फत जाहीर व लेखी पाठिंबा देण्यात आला. यावेळी जळगाव छावा संघटनेच्या महिला अध्यक्षा वंदनाताई पाटील, महानगर अध्यक्ष मोहिते दादा व जामनेर तालुकाध्यक्ष विलास पाटील, शेदूर्णी व छावाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






