थांबलेल्या कंटेनरला एसटी बसची धडक; १५ प्रवासी गंभीर

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : भरधाव वेगात निघालेल्या पुणे – उमरगा राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस व कंटेनरचा चिखलीजवळ अपघात झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले असून वाहक कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाची एस-टी बस रात्री पुण्याहून उमरगा कडे मार्गस्थ झाली होती, दरम्यान पहाटे तीनच्या सुमारास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला भरधाव वेगात निघालेल्या बसने धडक दिली. या धडकेत एसटी बस चक्काचूर झाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here