बस-डंपर अपघातातील बेस्टच्या बसचालकाचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : दादरमध्ये बुधवारी सकाळी बेस्ट बस आणि डंपरमध्ये झालेल्या अपघातातील बस चालकाचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्यावर महापालिकेच्या शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, अपघातातील वाहकासह तिघांची प्रकृती गंभीर असून ४ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

दादरमध्ये खोदादाद सर्कल येथे सकाळी मरोळवरून निघालेल्या तेजस्विनी बसला अपघात झाला. बसचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती डंपरवर आदळली. यात बसचा चक्काचूर झाला तर बसमधील ८ जण जखमी झाले. त्यांना तातडीने उपचाराकरिता शीव रुग्णालयात हलवण्यात आले.

आज सकाळी साडेसातला बसचालक राजेंद्र (५३) यांचे निधन झाले. बसवाहक काशीराम धुरी (५७), रूपाली गायकवाड (३६) आणि सुलतान (५०) यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेले प्रवासी मन्सूर अली (५२), श्रावणी म्हसकर (१६), वैदेही बामणे (१७) आणि ताहीर हुसेन (५२) यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती शीव रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी रणधीर सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here