जळगावात सराफा दुकानातून ५ लाखाचे दागिने लांबविले ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील ढाकेवाडीत नंदुरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्स दुकान फोडून ५ लाख रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज राविवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सराफ व्यावसायीकांमध्ये भीती पसरली. दरम्यान, चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

याबाबत असे की, प्रसन्न प्रदीप सराफ (रा.ढाकेवाडी) हे कुटुंबियांसह राहतात. त्यांचे घराच्या बाहेर नंदुरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. शनिवारी प्रसन्न यांनी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले. मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकान फोडले. दुकानातील पाच लाख रूपये किंमतीचे दागिने गोणीत भरून नेले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सकाळी ३.३२ वाजता चोरट्यांनी कटरने दुकानाचे दोन्ही कुलूप तोडले. दोन जणांनी आत प्रवेश केला. एक जण बाहेर थांबला होता. तिघांनी डोक्यावर टोपी, हातमोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेला होता. 3.48 वाजता दुकानात गेलेले दोन चोरट्यांनी गोणीत दागिने भरून परतले.

प्रसन्न सराफ यांची आई आज सकाळी बाहेर आल्या तेव्हा त्यांना दुकानाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जावून पाहिले दुकानात चोरी केल्याचे उघडकीला आले. एमआयडीसी पोलिसांना चोरी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले सहा.पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here