ऑनलाईन गेमच्या व्यसनाने तरुणाचा घेतला जीव

राजगड (मध्यप्रदेश) : येथे ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणावर लाखोंचं कर्ज झालं होतं. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तरुणाचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही आहेत. ही घटना राजगडमधील पडोनिया गावातील आहे. येथे राहणारा विनोद दांगी याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला.

कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, विनोदला ऑनलाइन गेम तीनपत्ती खेळण्याचं व्यसन लागलं होतं. यामध्ये तो तब्बल १० लाख रुपये हरला होता. यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून शांत झाला होता. विनोद आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन बहिणी आहेत. त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. कुटुंबीयांनी मना करून देखील तो गेम खेळणं थांबवत नव्हता. हळू हळू तो खेम हरू लागला आणि १० लाख रुपये हरला.

कुटुंबीयांनी सांगितलं की, विनोद तब्बल महिनाभरापासून उदास आणि शांत राहू लागला होता. त्याला कर्ज फेडण्याची चिंता लागली होती. एकेदिवशी तो अचानक घरातून गायब झाला. यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. घरातील सदस्यांनी त्याची ओळख पटवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here