समान कामाला समान वेतन हा श्रमिकांचा कायदेशीर अधिकार आहे.या साठी लढा उभारण्याचा संकल्प करूया.

ठाणे (प्रतिनिधी मुनिर खान) : रोजगाराचा प्रश्न हा कुटुंबाचा आहे. त्यामुळे आता पुरूष कामगारांनी घरातल्या महिलांसह संघर्षाला उतरावे. महिलांमध्ये चिकाटी असते. अधिकाराची जाणीव व विश्वास घेऊन हा लढा पुढे घेऊन चला. असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर यांनी श्रमिक मेळाव्यात बोलताना सांगितले.

रविवार ठाण्यातील डी.के.स्टेडियम मधील.समता कट्टा येथे श्रमिक जनता संघ,आयोजित श्रमिक संमेलनात अध्यक्षीय समारोप करत होत्या. यावेळी व्यासपीठावर युनियनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ, सरचिटणीस जगदीश खैरालिया, चिटणीस सुनील कंद, घर बनाओ घर बचाओ आंदोलन च्या पूनम कनोजिया, नर्मदा श्रमिक महिला संघाच्या ज्योती भदाने युनियनच्या कार्यकर्त्या स्वाती सावंत, अर्चना पवार उपस्थित होते. सभेची सुरुवात उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खिरी येथे अमानुषपणे शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेचा धिक्कार करत शहीद शेतकऱ्यांच्या अस्थीकलशला अभिवादन करून श्रध्दांजली देऊन करण्यात आली.

मेधा पाटकर यांनी पुढे सांगितले की, मोदी सरकारने कामगारांच्या न्याय हक्काचे ४४ कामगार कायद्यांपैकी २९ कायदे रद्दबातल ठरवत बाकीच्या कायद्यांमध्ये मालकधार्जिणे बदल करून त्यांचे चार कोड बनवले आहेत. त्यात मोदी सरकारने कामगार युनियनचे महत्त्व कमी करण्यासाठी सरकार युनियनचे अधिकार कमकुवत करीत आहे.

सरकार अडाणीला रोजचे दहा कोटी रूपये मिळवून देते, कष्टकऱ्यांना मात्र किमान वेतन ही नाही ! संवैधानिक अधिकार अर्थात सर्वांना समता आणि न्याय हवा. संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्ली बोर्डर वर ११ महिने आंदोलन सुरू आहे. अन्नदातांच्या आंदोलनात ६३१ शेतकरी शहीद झाले तरी अहिंसक मार्गानेच आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात असली तरीही शेतकरी आंदोलन महात्मा गांधीजींच्या अहिंसक मार्गानेच सुरु आहे. श्रमिक शेतकरी एकजूट झाली असून देशभरातील श्रमिक संघटना आता शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत. आता आपण वेतनाबरोबरच गरीबांच्या राशन का अधिकार, रोजगार का अधिकार, घर का अधिकार, बोलने की आझादी आणि वस्त्यांमध्ये विविध नागरिक अधिकार आदी संबंधित मुद्यांवर देखील जागरूक राहून आवाज उठवण्याचे आवाहन उपस्थितांना त्यांनी केले.

श्रमिक जनता संघाचे यश
संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी प्रास्ताविकात ठाणे, कल्याक्ण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ज्रेनेज, पाणी खाते, शिक्षण विभाग, घन कचरा तसेच मेंटल हॅास्पिटल मधील कंत्राटी कामगारांना युनियनने किमान वेतन, मागिल थकबाकी, दिवाळी बोनस आदी मिळवून दिले आहे. कामगारांवर न्याय मिळवून देण्यासाठी यापुढेही युनियन कटिबद्ध राहील, असे ते पुढे म्हणाले.

ठाणे जिल्हा कमिटीची घोषणा !
युनियनचे उपाध्यक्ष डॅा. संजय मं. गो. म्हणाले, जे कामगार प्रामाणिकपणे व संवैधानिक पद्धतीने लढतात त्यांनाच यश मिळते. समता, न्याय, कायदा व संविधान याआधारे आपण लढत राहू. यश नक्कीच मिळेल. यावेळी कामगारांनी श्रमिक जनता संघाची ठाणे जिल्हा कमिटी निवडण्यात आली. यात, सुनील कंद, भास्कर शिगवण, स्वाती सावंत, अर्चना पवार, विमल खाडे, संतोष देशमुख, विनायक आंब्रे, गणेश चव्हाण, प्रमोद जयस्वाल, सूरज वाल्मिकी, लक्ष्मण दुधावडे, समीर दरेकर, आदींची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनिल दिवेकर यांनी केले. संमेलनास मोठ्या संख्येने कामगार स्त्री – पुरूष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here