भिवापूर – पांदण रस्तातील खड्ड्यांनी शेतकरी व ग्रामस्थ झाले बेहाल

हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : भिवापूर पांदण या रस्त्यावर वाढलेल्या जीवघेण्या खड्ड्यांनी या रस्त्यांवर ग्रामस्थ व शेतकऱ्यांना ये जा करण्यास बैलगाडी घेऊन जाणेदेखील जिकीरीचे झाले आहे. तरी या रस्त्याचे काम तातडीने व्हावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हिंगणघाट हायवे नं ७ ला लागून असलेले भिवापूर पांदण या रस्त्याचे कामच झालेले नसून, या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. फुकट्याजवळच लागून असलेल्या रस्त्यावर उड्डाणपूल नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांतील खड्ड्यांमधून शेतकरी व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून वाट शोधावी लागत आहे.

पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठून चिखल झाल्याने, त्यात ट्रॅक्टर, बैलगाडी फसतात. बैलदेखील आजारी पडत असून, साधारण पाऊस जरी झाला तरी गावाचा संपर्क इतर भागांशी तुटून जातो. भिवापूर पांदण हा रस्ता भिवापूर फुकटा हा रस्त्याने शेतकरी कापूस, तूर, सोयाबीन नेण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने, याच रस्त्यावर जीव धोक्यात घालून गेल्या १७ वर्षांपासून ये जा करत आहेत.

पूर्ण पांदण रस्ता हा चिखलाचा असून, या रस्त्यावरील खड्ड्यांकडे पदाधिकारी व वरिष्ठांनी लक्ष देवून लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी मनसेचे हिंगणघाट तालुका,संघटक,जयंत,कातरकर,पोहणा, सर्कलचेराजू सराटे मारोतराव धाडवे ,देवरावजी राऊत, वामन वाघ ,अतुल धाडवे ,संदिप धाडवे ,संजय धाडवे ,रविन्द्र वावंधने , भिवापूर शेतकऱ्यांची ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here