अमरावती बंद : भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंसह अनेक नेत्यांना अटक

अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : बंदमध्ये सहभागी झालेल्या भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. भाजप नेते आणि महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना अटक करण्यात आली असून भाजपाच्या १२ प्रमुख नेत्यांसह २ ते ३ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, गटनेते तुषार भारतीय, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णीसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. अमरावती शहरातील साईनगर कॉलनीतील गणेशविहार येथील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या अचलपूरसह तीवसा शहरासह अनेक भागांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे असे आदेश उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी निर्गमित केले आहेत.


शुक्रवारी निघालेल्या मोर्चाला अमरावती शहरात गालबोट लागलं याच पार्श्वभूमीवर शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या व पाण्याचा फवारा मारून जमावाला पांगवले होते.



सध्या अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात रहावी याकरिता अचलपूर, परतवाडा, तीवसा, दर्यापूर, अंजनगाव धामणगाव चांदुर रेल्वे आदी शहरांमध्ये पोलीस पोलीस बंदोबस्तात सह संचारबंदी लागू करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here