आजरा येथे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

Constitution Day

कोल्हापूर ( महाराष्ट्र crime रिपोर्टर सतीश चव्हाण ) : 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ (Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले. भारत सरकारने 2015 साली राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती दिवशी हा दिवशी संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो याचेच औचित्य साधून आजरा पोलीस ठाणे व उडान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आजरा येथे सविधान व त्याचे स्वीकृती याबाबत साहेब पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे व पोलीस नाईक चेतन घाडगे यांच्याकडून प्रबोधन करण्यात आले .तसेच आजरा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार तसेच नागरिक यांना संविधाना बाबत शपथ देण्यात आली.

त्याच पद्धतीने 26/11/2008 मध्ये मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा भ्याड हल्ल्यात पोलीस अधिकारी अंमलदार व निष्पाप नागरिक बळी पडले त्यांच्या स्मरणार्थ व पोलिस अधिकारी यांनी केले साहस व पराक्रम याचे आठवणींना उजाळा देण्यात आला.तसेच त्यांच्या प्रतिमे पुढे मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे वीर जवान ऋषिकेश जोंधळे व संग्राम पाटील यांनी देशासाठी दिलेले बलिदान बाबत त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

Constitution Day1

सदर कार्यक्रमास आजरा शहराच्या प्रथम नागरिक जोश्ना चराटी , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे ,पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव , माझी सैनिक , आजरा पोलीस ठाण्याच्या अंमलदार, विविध पक्षाच्या राजकीय पुढारी ,आजरा शहराचे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार ,तसेच उडान फाऊंडेशनचे चेतन घाटगे, विशाल सुतार ,रणजीत सुर्यवंशी असे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here