हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाचेवतीने महाराष्ट्र मंडळ बैठकीचे आयोजन काल दि.३ रोजी स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख, नागपूर महामंत्री जुनेद खान,नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,रमजान अन्सारी, सरफराज लीडर, बिस्मिल्ला खान बि.के, सलीम सिद्दीकी, कौसर अंजुम, युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्बत, भाजपा जिल्हा सचिव सुभाष कुंटेवार, हनीफ भाई, मजाज कुरेशी तसेच याप्रसंगी ३० हजार रुपयांचा धनादेश देणारे कादरभाई बोहरा इत्यादि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बिस्मिल्ला खान यांनी केले तर आरिफ काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी हसंनअली अजानी, रजा अजानी, सोहेब अली, जुजर अली, दानिश खान, समीन फारुकी, खान सहाब, डॉ. फिरोज खान, हिना खान, अब्दुल रउफ, मलक याशीन, मेहबूब खान इत्यादींनी परिश्रम घेतले.






