धुळे (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी सापळा रचून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून आठ किलो गांजा व दुचाकी असा एकूण १ लाख ३७ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
शिरपुरकडुन धुळ्याकडे महामार्गाने एक विनानंबरची स्कुटी दुचाकीतुन गांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास सापळा रचून सतिश किसन घोडे (वय-२१, रा.पवन नगर,चाळीसगाव चौफुली जवळ, महादेव मंदिराशेजारी, धुळे) व राहुल वाल्मिक सुर्यवंशी (वय-२०, रा.विटाभटटी, दुर्गामाता, मंदिराजवळ, देवपुर, धुळे) यांना ताब्यात पकडले. त्यांच्याकडुन एकुण १ लाख ३७ हजार ७०० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. त्यात सुमारे ८ किलो ९६० ग्रॅम गांजा व विनानंबरची स्कुटी समावेश असुन सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मागदर्शनाखाली सपोनि चंदकांत पाटील, उपनिरीक्षक राजश्री पाटील, पोहेकॉ विजय पाटील, पोना अंबरीष सानप, पोकॉ सुरजकुमार सावळे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ मनोज बोरसे, पोकॉ किरण पारधी, असईअजय सोनवणे यांनी केली आहे.






