वेद फाउंडेशन द्वारा आश्रमातील बालिकांसमवेत नाताळ साजरा

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : गोरेगाव स्थित विशेष व्याधिग्रस्त बालकांसाठी स्थापित आश्रमातून आज वेद फाउंडेशन द्वारा बालिकांना वस्त्र तथा पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिका तथा शिक्षिका सौ मंजू सराठे आणि डॉक्टर वैभव पाटील यांच्या निधीतून उपलब्ध वस्त्र आणि पौष्टिक आहाराचे नाताळच्या सणाचे निमित्त साधत वितरण करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेच्या सल्लागार सौ सोनल गांधी साई परिवाराचे अध्यक्ष श्री मंगेश रासम तथा अंकुश रासम उपस्थित होते संस्था अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार यांनी या नियोजनासाठी सौ मंजू सराठे आणि वैभव पाटील यांचे सन्मानपत्र देऊन गौरव करीत आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here