कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफीज खान) : येथील भारती पुरा या ठिकाणी रहात असलेला रिजवान खान अब्दुल्ला खान नावाचा इसम असून तो मुलगा मजुरी करण्याकरिता गेला असून तो ५ फुटाच्या स्टूल वरून खाली पडल्यानंतर त्याच्या डाव्या पायावर मार लागल्यामुळे डॉक्टरानी त्याला सांगितले की तुझा पाय तुटला असून तुला ऑपरेशन करावा लागणार तर त्या मुलाच्या घरी नगरसेवक व प्रभाग क्रमांक 13 ब मधील निवडून आलेले जावेदोदिन इस्लामोदीन यांनी तात्काळ पेशंटच्या घरी जाऊन सांगितले की तू फिकर नको करू मी तुला चांगला करून आणेल असे म्हटले.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाऊन साई आशा किरण हॉस्पिटल डॉक्टर महेश चव्हाण यांच्या यांच्या हस्ते शासनाच्या योजनेनुसार विनामूल्य ऑपरेशन करून दिले असे समाज कार्य नगरसेवक जावेदोदिन बरेच दिवसापासून करत आहेत तरी आज कारंजा याठिकाणी नगरसेवक जावेदोदिन यांनी समाजकार्य केले असून समाजात नगरसेवक जावेदोदिन यांची प्रशंसा केली जात आहे आणि पुढील असे कार्य त्यांनी करावं अशी शुभेच्छा देत आहे.






