ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : छत्रपती क्रीडा मंडळ संलग्न स्वप्न साकार प्रतिष्ठान आणि स्वप्न साकार महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३/०२ २०२२ रोजी सालाबाद प्रमाणे यावर्षी भव्य हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता तसेच छत्रपती रहिवासी संघ कार्यालयाचे नूतनीकरण आणि उद्घाटन केले.
याप्रसंगी आमदार माननीय श्री निरंजन डावखरे साहेब तसेच स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर साहेब, माजी नगरसेविका सौ राधा पत्तेबहादुर सिंग, राष्ट्रीय महिला अध्यक्षा महिला शक्ती फाउंडेशन सौ.शोभना ओवाळ,सौ. प्रमिला भांगे, नगरसेवक श्री दिलीप बारटक्के साहेब, शाखाप्रमुख श्री दिनेश मलपे, आणि मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्वप्नसावकार महिला बचत गट अध्यक्षा -सौ. प्रतिक्षा सतिश बनसोडे आणि सर्व महिला पदाधिकारी व सदस्य आणि विभागातील महिला यांनी हळदीकुंकवाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमास छत्रपती क्रीडा मंडळ अध्यक्ष पप्पू कदम मंडळाचे सल्लागार श्री सतीश बनसोडे आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.







