जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : बाबा तुमच्या हातातील अंगठी फार सुंदर असून मला अशीच आणखी मला घ्यायची आहे. असे सांगत एका ७५ वर्षे वृध्दची २४ हजार किमतीची अंगठी घेउन बामटा दुचाकीने पसार झाल्याची घटना उघडकीस आली असुन याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरुण गिरधर धांडे, ( वय- ७४ रा. संचित रणछोडदास नगर जळगाव ) हे ३१ जानेवरी रोजी दुपिरी १ वाजेच्या सुमारास गणेशवाडी येथे आले होते. त्यावेळी घरी परतत असतांना अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांना त्याने लिफ्ट देऊन पुढे एका सुनसान जागी दुचाकी लावुन पाचशे रुपयांचे सुटे आहेत का ? अशी विचारणा केली. धांडे यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्या हातातील अंगठीकडे भामट्यांने लक्ष असल्याने त्याने अंगठी दाखवा म्हणत वृध्दाच्या बोटातुन अंगठी स्वत:च्या बोटात घालुन दुचाकीला किक मारून पोबारा केला.
त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील करत आहे.







