काश्मिरात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एक पोलीस अधिकारी शहीद; चार जवान जखमी

kashmir
संग्रहित छायाचित्र

जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : उत्तर कश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकावर ग्रेनेडहल्ला केला. यात जम्मू-कश्मीर पोलीस दलातील विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) जुबैद अहमद हे शहीद झाले, तर अन्य ४ जवान गंभीर जखमी झाले आहेत.



हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराला घेराबंदी घालून सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे. दहशतवाद्यांनी शुक्रवारी दुपारी निशात पार्क परिसरात बांदीपोराजवळ पोलीस आणि सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) संयुक्त पथकावर ग्रेनेडहल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सुरक्षा दलांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले.



यावेळी जम्मू कश्मार पोलिस दलातील एसपीओ जुबैर अहमद यांना प्राण गमवावा लागला, तर ४ जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यात पोलीस दलातील तीन, तर सीमा सुरक्षा बलाच्या एका जवानाचा समावेश आहे. कश्मीर खोऱयात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. कारवाईच्या विशेष मोहिमांमुळे दहशतवादी चवताळले असून त्याच संतापातून ते सुरक्षा दलांना टार्गेट करू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here