केतकी चितळेच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात होणार सुनावणी

ketaki-chitale

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महत्वाची बाब म्हणजे ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाकडून कोठडी देण्यात आली असून गोरेगाव पोलीसांनी केतकीचा ताबा घेतला आहे. आता गोरेगाव पोलीस मुंबईकडे रवाना झाले आहेत.

शरद पवार यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे आज पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्या बाबतीत या पूर्वीच मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी ताबा मागितल्यावर त्यांना ताबा दिला होता. मात्र, ठाणे जेलमधून तिचा ताबा घेता आला नव्हता. थोड्या वेळापूर्वी ती ठाणे जेल आवारात होती.

पोलिसांना केतकीच्या जामिनाबाबतीत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सांगावे असं न्यायालयाने सांगितलं आहे. तोपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केवळ सायबर कलम ६६ अ अन्वये युक्तिवाद झाला आहे. केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी बाजू मांडली. केतकीच्या जामीन अर्जावर अजुन ही सुनावणी झालेली नाही. जामिनावर आज दुपारी ३ वाजता सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here