भराडी परिसरात अवैध धंद्ये बोकाळले; सिल्लोड ग्रामीण पोलिस प्रशासन घेतय झोपेचे सोंग

police-constable

सिल्लोड (प्रतिनिधी संजय दांडगे) : तालुक्यातील भराडी, कासोद, भराडी ते अंभई रस्त्यावरील वडोद चाथा,सह परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांना ऊत आला असून पोलिस प्रशासन मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.

तालुक्यातील भराडी हे मोठे बाजारपेठेचे गाव असून या परिसरात बहुतांश छोटे-मोठे हॉटेल चालक हॉटेलच्या नावाखाली अवैध देशी दारू विक्री करत आहे. याकडे मात्र पोलिस प्रशासन कानाडोळा करत आहेत.तसेच या परिसरातील अनेक माता भगिनींचे संसार हे या दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. तसेच तरुण वर्ग हि मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहेत.असे असताना या परिसरातील स्थानिक पोलिस प्रशासन हे अवैध दारू विक्री करणाऱ्यांशी संगनमत करून आपले खिसे चांगलेच गरम करून घेताना दिसून येत आहे.

परिसरात देशी दारूची विक्री ही कमी किमतीत आणून जादा भावात विक्री करण्याचे धंदे ठिकठिकाणी थाटले असून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध देशी दारूची वाहतूक सुरू असून अजिंठा पोलिसांचेही पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून व महिलांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here