जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : दहशतवाद्यांनी कुलगाममधील बँक कर्मचारी विजय कुमार यांची भरदिवसा बँकेत घुसून गोळ्या घालून हत्या केली आहे.या हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले विजय कुमार यांचा काही दिवस पाठलाग केल्यानंतर दहशतवाद्यांनी हे पाऊल उचलले आहे. ही संपूर्ण घटना बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
कुलगाममधील बँकेत एक व्यक्ती बॅग घेऊन बँकेत शिरली. आत जाण्यापूर्वी त्याने एकदा मागे वळून पाहिले, आत आल्यावर त्याने एकदा डावीकडे आणि उजवीकडे पाहिल्यानंतर समोरच्या केबिनमध्ये बसलेल्या मॅनेजरवर पिस्तुलाने गोळीबार केला. गोळीबारानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या हल्ल्यामध्ये बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला.
#WATCH | J&K: Terrorist fires at bank manager at Ellaqie Dehati Bank at Areh Mohanpora in Kulgam district.
The bank manager later succumbed to his injuries.
(CCTV visuals) pic.twitter.com/uIxVS29KVI
— ANI (@ANI) June 2, 2022
विजय कुमार हे राजस्थानमधील हनुमानगढचे रहिवासी होते, ते कुलगामच्या (kulgam) मोहनपुरा येथे बँक मॅनेजरच्या पदावर होते, दहशतवाद्यांनी त्यांना बँकेच्या आतच गोळ्या घातल्या. दोन दिवसांत ही दुसरी हत्या आहे. मंगळवारी शाळेतील शिक्षिका रजनीबाला यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आणि आज सकाळी बँक मॅनेजर विजय कुमार यांना टार्गेट करण्यात आले. हा हत्येचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.







