अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ जुलैपर्यंत वाढ

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर १५ दिवस कोठडीत ठेवले होते त्यानंतर अनिल देशमुख यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.



तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी जामीन मिळवण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयात देखील अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर अद्याप सुनावणी घेण्यात आलेली नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.



अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडी काल संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाकडून पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here