मुंबई (महाराष्ट्र राज्य सहसंपादक पंकज जैन) : मुंबईत एका महिलेने एक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याविरोधात हनीट्रॅप लावून २ कोटींची मागणी केल्याप्रकरणी नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार एका महिला विरोधात अंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार करणारा आरोपी हा एक राष्ट्रीय पक्षाचा नेता सोलापूर येथील असून, त्याने तक्रारीत आरोपी महिला ही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवत मुंबईत घर व २ कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे या नेत्याकडून आरोपी महिलेने या पूर्वी टप्याटप्प्याने १ लाख ७८ हजार फोन पे व २ लाख रुपये रोखीने स्वीकारल्याचे आरोप केले आहे. एवढ्यावरच न थांबता महिलेने नेत्याला बोलावून राजकीय व सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकीही दिली आहे.
आरोपी महिला ही राजकिय नेत्याची नातेवाईक आहे. या नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार महिले विरोधात मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८४, ३४१, ५०४ अंतर्गग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.







