व्हायरस प्रोडक्शनने गोविंदा पथकांसोबत ऑनलाईन संवाद साधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – महाराष्ट्रासाठी १२ ऑगस्ट हा दही हंडीचा सण म्हणजे आनंदाचा जल्लोष असतो. मात्र, यंदाच्या कोरोना कोविड – १९ च्या व्हायरसमुळे आपण सगळ्यांनीच हा सण या वर्षी साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याने “व्हायरस प्रोडक्शन” ने गोविंदा पथकांसोबत ऑनलाईन संवाद साधून त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन एक आगळावेगळा दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. संध्याकाळी ७ वाजता युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून सुरू झालेला हा कार्यक्रम जवळजवळ १ तास चालला.
बालवीर गोविंदा पथक – चेंबूर, सह्याद्री गौरव प्रतिष्ठान आणि नेरुळचा महाराजा गोविंदा पथक – नेरुळ, एरोली कोळीवाडा गोविंदा पथक या तीन पथकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. कु. कोमल झेंडे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. तसेच कु. तेजस म्हसकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळून हा उत्सव साजरा केला. स्पर्धा नाही तर संस्कृती जपण्यासाठी हा संदेश नेरुळचा महाराजा या गोविंदपथकाने दिला. तर गोविंदाची दरवर्षी कशाप्रकारे काळजी घेतली जाते व विमा उतरवला जातो. या बाबत संपूर्ण माहिती ही दिली. सध्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐरोली कोळीवाडा पथक यांनी सामाजिक बांधिलकी जपत या वर्षी घरोघरी कोरोना किटचे वाटप केले. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुर्यकांत मढवी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावेळी दिली.
अशा प्रकारचे कार्यक्रम ‘व्हायरस प्रोडक्शन’ सध्या आयोजित करत आहेत. तसेच १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास सलाम या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून शूर वीरांच्या कार्याला सलाम देऊन यात आतापर्यंत कारगिलच्या विजयाची गाथा आणि सद्रक्षणाय खलनिग्रहणाय यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद देऊन यांच्या शौर्याला सलाम दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here