मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – चिपळूण तालुक्यातील सुपुत्र वैभव राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “स्वराज्य ग्रूप” या संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या ग्रुपतर्फे नुकताच चिपळूण तालुक्यातील ‘करंबवणे’ या गावी सध्याचं अखंड जगावर असणारं कोरोनाच संकट व दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव याची झळ अनेकांना पोहचली आहे. या गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार करून अशा खडतर काळात सामाजिक बांधिलकी जपताना अत्यंत गरजू व्यक्तींना एक हात मदतीचा व कर्तव्य समजून आणि कोरोनाच्या काळात शासकीय नियमांचे पालन करून ‘स्वराज्य ग्रूपतर्फे’ उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या गावच्या गरजू कुटुंबीयांना तेल, डाळ, चहा पावडर, बिस्किट आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या वस्तू यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाला वैभव राऊत यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचं आर्थिक सहकार्य केले. या उपक्रम दरम्यान शांताराम बान्द्रे, हरिश्चंद्र खाले, बबन मोहित, दौलत इटले, बाळकृष्ण कदम, अनंत शिगवण, संदीप बान्द्रे व प्रमोद बान्द्रे हे उपस्थित होते. या कार्याचे अनेकांकडून कौतुक होत असल्याचे समोर येत आहे.








