बेलापूर सीबीडी (यशवंत चव्हाण) – विजय दुर्ग किल्ल्याला जलदुर्ग,घेरिया,सागरी दुर्ग,जिब्राल्टर ह्या नावाने ओळखला जातो.मुंबईपासून ४७० किलोमीटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडजवळ हा अभेद्य चारीबाजूनी समुद्राच्या पाण्यात उभा असलेला हा भक्कम किल्ला ८०० वर्ष जुना आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला अदिलशाकडून १६६४ ला जिंकून स्वराज्यात आणला आणि ह्यकिल्ल्यावर प्रथम ध्वज हि शिवरायांनी रोवला.असा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला शिवरायांनी पाच एकर वरून १७ एकर पर्यंत वाढवत नेवून २७ बुरुज भक्कम उभे करून त्या बुरुजांना शौर्य गाजवणाऱ्या मावळ्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला.हि भक्कम तटबंदी करताना अंतर्गत आमूलाग्र बदल केले त्याला त्यावेळी अडीच लाख रु. खर्च आला.इंग्रजांनी तुफान तोफांचा मारा करून सुद्धा किल्ला अभेद्य राहिला.महाराजांनी किल्ल्याला विजयदुर्ग असं सार्थक नामकरण केले.असा हा समुद्री किल्ला आताच्या पावसाळ्यात जीबीच्या तटबंदीजवळचा खालचा भाग ३ ऑगस्ट रोजी कोसळला.मनोवेदना झाली. सदर किल्ला हा राष्ट्रीय स्वरक्षक स्मारक म्हणून त्याला राज्य सरकारने १९१६ ला मान्यता दिली.केंद्र /राज्य सरकार पुरातत्व विभाग,पर्यटन सांस्कृतिक विभाग ह्यांनी तातडीने तटबंदीची पुनर्बांधणी करावी.हा शिवकालीन ऐतिहासिक शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांचे जतन करण्यासाठी व पुढील पिढीला तसेच जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्र व शिवरायांचा अमूल्य ठेवा नेत्रसुख पाहायचं ,अनुभवायचं व अबाधित ठेवणे हि काळजी गरज आहे.पंतप्रधानांनी देशाला वीस लक्ष कोटींचे पॅकेज जाहीर केले त्यातील काही रक्कम “देशातील”‘ भग्नवस्थेत गेलेले शौर्याच्या किल्ल्यासाठी खर्च करणे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.हे किल्ले म्हणजे राष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे.देशात काही अघटित घडले आर्थिक,नुकसान जीव हानी झाली राज्य आणि केंद्र सरकार त्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी बहाल करतात परत त्यांच्यावर पाच,दहा पन्नास लाखांची आर्थिक उधळण,तीही जनतेच्या कर रूपातून जमा झालेली,जनतेच्या हितासाठी असलेली रक्कम वयैक्तित व पक्षाच्या बडेजावसाठी का वापरता,कशासाठी ह्या अश्या अनिष्ट गोष्टींना तिलांजली देणे आवश्यक आहे.देशाचं इतिहासकालीन असलेलं वैभव जतन व त्याची डागडुजी करून पर्यटनासाठी व त्यायोगे रोजगार निर्मितीसाठी अग्रक्रम द्यावा.







