शेतकऱ्यांची जनावरे त्वरित परत करा- मेहरुण मधील समाज सेवकांची मागणी

जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देतांना इक्बाल पिरजादे,फारूक शेख,झिया बागवान,जमील शेख आदी दिसत आहे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – २५ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांनी मेहरून परिसरातील शेतकऱ्यांच्या घरासमोर बांधलेली १४१ गुरे जप्त करून घेऊन गेले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी २९ जुलै रोजी तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला व ६० जनावरे अधिकृतरीत्या जप्त करून ८२ जनावरे ही आठ शेतकऱ्यांची मालकीची व पारंपारिक शेती उद्योगाशी संबंधित असल्याने पूर्णपणे पोलिसांचे समाधान झाल्याने ती ८२ जनावरे ८ शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश व सुपूर्त नामा करून शेतकऱ्यांना दिला.
३० जुलैपासून आरसी बाफना गोशाळा सेवा केंद्र कुसुंबा येथे हे शेतकरी रोज जात असून त्यांना त्यांची गुरे देत नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी दिनांक ७ ऑगस्ट रोजी त्यांची गुरे तीन दिवसात न मिळाल्यास आत्मदहनाचा ची नोटीस जिल्हाधिकारी यांना दिली होती.
११ ऑगस्ट रोजी माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासमक्ष मेहरूण परिसरातील समाजसेवकांनी त्या शेतकऱ्यांना आत्मदहना पासून परावृत्त केले व तुम्हास तुमचे गुरे कायदेशीर मार्गाने परत मिळवून देऊ असे आश्वासन दिले. त्या वेळी उपस्थित सुशील कुमार बाफना उर्फ पप्पू सेठ यांनी सुद्धा गुरे देण्याचे मान्य केले होते.
पोलिसांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने ते आत्मदहन मागे घेण्यात आले. परंतु १२ ऑगस्ट रोजी सुद्धा आर सी बाफना यांनी गुरे देण्यास नकार दिला व तुमच्याकडून जे काही करता येईल ते करा अशी भाषा वापरल्याने मेहरुण शिवारातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगर सेवक इक्बाल पिरजादे, मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारुक शेख,एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष झीया बागवान, काँग्रेस चे जमील शेख, शिव सेना नगर सेवक इब्राहिम पटेल, राष्ट्रवादी चे सलीम इनामदार, जमियत उलमा चे हाफिज शफिक, ईदगाह ट्रस्ट चे अनिस शाह, नगरसेवक रियाझ बागवान, हाजी युसुफ शेख व कुल जमातीचे बशीर बुऱ्हानी यांनी एकत्रित येऊन माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आर सी बाफना हे कायदेशीर ८२ गुरे सुद्धा शेतकऱ्यांना परत करत नाही व पोलीस सुद्धा आर सी बाफना कडून घेऊन देत नसल्यामुळे आपण जिल्हादंडाधिकारी म्हणून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आर्त हाक दिली. यावर त्वरित निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे लेखी निवेदन दिले. जिल्हादंडाधिकारी यांनी पोलिसांचे प्रथम खबरी आदेश क्रमांक ९९४-२० वाचून खात्री केली व याप्रकरणी पोलिसांना सदर गुरे देण्याबाबत आदेश करतो असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here