अभिनेत्री स्नेहलता वसईकरचे गाजतेय ग्लॅमरस फोटोशूट

actress-snehlata-vasaikar1

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : स्वराज्यरक्षक संभाजी, ‘अहिल्याबाई होळकर’ या मालिकांमधून ऐतिहासिक भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकरने नुकतेच केलेले बोल्ड फोटोशूट चांगलेच गाजत असून, त्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे.

actress-snehlata-vasaikar

स्नेहलता वसईकर सातत्याने नवनवीन भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकत आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी सोयराबाईंची भूमिका तसेच ‘अनुपमा’ या गाजलेल्या वेब सिरिजमध्येही तिने केलेली महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका विशेष गाजली होती.

 

https://www.instagram.com/p/CgB8Pq7Ksha/?utm_source=ig_web_copy_link

 

सध्या सोशल मीडियावरील तिचा वावर वाढला असून विविध फोटो आणि व्हिडिओ ती शेयर करत असते. नुकतेच तिने बोल्ड फोटोशूट करून घेतले आहे. फोटोमध्ये स्नेहलताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून, फोटोशूट वर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

https://www.instagram.com/p/Cf_AEd-rSvC/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/Cf6I7efL35S/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/CfGynsprwZh/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here