घटस्थापनेच्या दिवशीच तरूणीवर काळाचा घाला; आंघोळ करत असतांना ट्रकने चिरडले

नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता देळुबकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने एका घराच्या बाथरुमला धडक दिली. या बाथरुमध्ये आंघोळ करत असलेली वर्षा माणिक मदने, (वय १९) ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.




हा अपघात दि. २५ सोमवारी रोजी सकाळी ८ वाजता झाला. अपघातात दोन मोटरसायकलचा चुराडा झाला आहे. या अपघातातील ट्रक (क्रमांक एमएच-२६, बीई ९१९३) पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउनि साईनाथ सुरवशे, पोउनि कपील आगलावे, महेंद्र डांगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.




दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्षा मदने ही नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने योग या विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. घटस्थापनेलाच ही घटना घडली असून या घटनेमुळे ट्रक चालकाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here