भरधाव बसचा टायर फुटल्याने बसची मिनी ट्रकला धडक; १ ठार १४ जखमी

st-bus-and-mini-truck-accident-at-yavatmal

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : कंधार आगाराची बस प्रवासी घेऊन नागपूरकडे जात असताना नागपूर तुळजापूर महामार्गावर मारले गाव गावाजवळ भरधाव बसचा टायर फुटला. या अपघातात बस थेट मिनी ट्रकवर जाऊन आढळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाल्याची घटना सोमवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.



घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना नांदेड येथे हलविण्यात आले. कंधार नागपूर जाणारी महामंडळाची बस (क्रमांक एम एच ४० एन ९६३४) ही उंबरखेडकडे जात असताना बसचा अचानक टायर फुटला.



बस हातगावकडे निघालेल्या मिनी ट्रक (क्रमांक एम एच २६ एच ९८२१) ला जाऊन धडकली या भीषण अपघातात मिनी ट्रक मधील मजूर संतोष काळबांडे यांचा मृत्यू झाला. तर तर बसमधील प्रवासी बस चालक विठ्ठल पुंडे, वच्छला काळे, जनाबाई कांबळे, कपिल सावळे, मारुती शिंदे, मारुती नरवाडे, रोशनी जामोदकर, सीमा जामोदकर, सविता नरवडे व परशुराम पांचाळ हे प्रवासी जखमी झाले आहे. यांच्यावर उंबरखेड शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here