पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला युनिट एकने जेरबंद केले असून, या टोळीकडून कडून दोन कोयते, मिरची पावडर असा दरोड्याचा ऐवज जप्त केला आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युनिट एकचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी भवानीपेठ परिसरात काहीजण संध्याकाळी एकत्र जमणार असून ते दरोडा टाकण्याची तयारी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ कोयते, नॉयलॉन दोरी, मिरची पुड, दांडके अशी हत्यारे जप्त करुन जेरबंद केले. त्यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, घरफोडी, मारामारी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी आमान समीर शेख (वय- २२, रा. काशेवाडी, भवानीपेठ,) अमीर समीर शेख (वय – २०, रा. काशेवाडी, भवानीपेठ), अमोल अनिल अंबवने (वय – २०), शारूख दाऊद सय्यद (वय – २६. रा. कोंढवाखुर्द) आणि सादीक अमीर शेख (वय – २५, रा. काशेवाडी भवानीपेठ) यांना ताब्यात घेतले आहे. भवानी माता मंदिराजवळील एक व्यापारी रात्रीचे वेळी दुकानातील कॅश घेवून याच रोडने जात असताना त्याला लुटण्याचे तयारीत असल्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, महेश बामगुडे,निलेश साबळे यांनी केली.