पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेश पाटील) : वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण ८०१ बॅग रक्त संकलन झाले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली आहे. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत पाच ठिकाणी मतदान शिबिरे घेण्यात आली होती. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळ, सर्व ग्रामपंचायत, सर्व पोलीस पाटील, सर्व होमगार्ड, महिला दक्षता समिती, सर्व सेवाभावी संस्था, तसेच सर्व नागरिकांच्या मदतीने व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.