जामनगर : येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या फ्लाइटमध्ये बॉम्ब असण्याची शक्यता असल्याने जामनगर विमानतळावर लँडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धमकीमुळे पोलीस प्रमुख यांच्यासह बॉम्बशोधक पथक विमानतळाकडे रवाना झाले. जामनगर विमानतळाला चारही बाजूंनी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
जामनगर विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान मेक्सिकोहून गोव्याला जात होते. विमानात बॉम्ब असण्याच्या संशयाने जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
जामनगर पोलिस नियंत्रण कक्षाला विमानात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. संपूर्ण घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलिस प्रमुखही विमानतळावर पोहोचले. गोवा एटीसीला बॉम्बची धमकी देणारा मेल प्राप्त झाला होता.







