दिंडोशी पोलिसांनी जप्त केली १० लाखांची बनावट नाणी

Dindoshi-police-seized-10-lakh-fake-coins

मुंबई (उपसंपादक सुरेश पटनायक) : मालाड पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्क परिसरातून १० लाखांची बनावट तांबे आणि पितळी नाणी जप्त करण्यात आली आहेत. ज्यामध्ये १ रुपयांपासून ५ रुपये आणि १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे. ही कारवाई दिल्ली पोलिस आणि दिंडोशी पोलिसांनी संयुक्तरित्या केली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नाणे बनवण्याचा हा कारखाना हरियाणामध्ये चालवला जात होता. ज्यामध्ये दिल्लीच्या स्पेशल सेलने कारवाई करत ५ जणांना अटक केली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक मुंबईत मोठ्या प्रमाणात बनावट नाणी आणायचे आणि धार्मिक ठिकाणी फुकट पैसे देण्याच्या नावाखाली खरे पैसे घ्यायचे. हा प्रकार बऱ्याच काळापासून सुरु होता.

 

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल मुंबईत आला होता. दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खोट्या नाण्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या माहितीच्या आधारे दिंडोशी पोलीस ठाण्याचे पीआय कवडे आणि एपीआय गोकुळ पाटील यांच्या पथकाने दिल्ली पोलिसांसह मालाड पुष्पा पार्क येथील वल्लभ ए विंग सोसायटीत संयुक्त कारवाई केली. तेथून मोठ्या प्रमाणात बनावट नाणी जप्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here