जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) । आज शहरातील टॉवर चौक येथे जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल आळंदी येथे पालखी सोहळ्याच्या दरम्यान वारकऱ्यांवरती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गळ्यात टाळ व डोक्यावरती टोपी घालून टाळ्यांच्या गजरामध्ये या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त करत एक अनोखे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना जिल्हाध्यक्ष मराठे म्हणाले की, गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच कथाकथित हिंदुत्ववादी स्वतःला संबोधणारे भाजप पक्षाचे नेते यांनी वेळोवेळी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले अशा थोर महापुरुषांचे अपमान केले व आज साडेतीनशे वर्षे जुनी परंपरा असलेला वारकरी संप्रदाय यांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांवरती करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त केला गेला
भाजपच्या कार्यकर्त्यांना युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केले थेट आव्हान..
जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी तर थेट भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच आव्हान केले की, “तुमचे नेते जरी खोटे हिंदुत्ववादी असले तरी, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते जर खरे हिंदुत्ववादी असाल तर ज्याप्रमाणे सावरकरांसाठी तुम्ही रस्त्यावरती उतरले त्याचप्रमाणे तुम्ही या वारकरी संप्रदाया करता देखील रस्त्यावरती उतरा व या भाजप सरकारचा व गृहमंत्र्यांचा तुम्ही जाहीर निषेध करा, त्याच चौकामध्ये आम्ही तुमचा सत्कार करू या.” पद्धतीचा आव्हान भाजपच्या कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष श्याम तायडे, प्रदीप सोनवणे, विजय वाणी, जाकीर बागवान,सुधीर पाटील, रवींद्र चौधरी, सुरेंद्र कोल्हे, बाबा देशमुख, दीपक सोनवणे, योगिता शुक्ला, छाया कोरडे, सुमन मराठे गोकुळ चव्हाण, मालोजीराव पाटील आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







