मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

mumbi-police
File photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । शनिवारी शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले होते. या ऑपरेशन दरम्यान अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या २९ आणि अमली पदार्थाची व्यसन करणाऱया ८३ जणांवर कारवाई केल्याची नोंद आहे.

 

शनिवारी भर पावसात मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवले होते. पोलिसांनी २१५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील २३६ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या ऑपरेशन दरम्यान अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या १९ आणि व्यसन करणाऱ्या ८३ जणांवर कारवाई केली.

 

तडीपार असलेल्या ४८ जणांवर कारवाई केल्याची नोंद आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी २६ गुन्हे दाखल केले. २८ शस्त्र आणि अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याची नोंद आहे. पोलिसांनी १०५ ठिकाणी नाकाबंदी लावून ५९२७ वाहनांची तपासणी केली. मोटार वाहन कायद्यानुसार १९९५ जणांवर विविध कलमानुसार कारवाई केल्याची नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here