वरळी येथील गोविंदा पथकाने केले मोफत दुधवाटप

मुंबई (प्रमिला जाधव) – संयुक्त मानाजी राजुजी चाळ कबड्डी महर्षी कै.बाबाजी दाजी जामसांडेकर स्मृती गोविंदा पथकाने या वर्षी कोरोनाच्या महामारी मुळे यंदाच्या वर्षी दहिकाला उत्सव साजरा न करता, एक सामाजिक उपक्रम म्हणून राजाराम बापू दूध संघ ( कृष्णा दूध ) यांच्या सहकार्याने लोअर परेल विभागात मोफत दूध वाटप केले.तसेच बाल आशा संस्था ( महालक्ष्मी ) या अनाथ आश्रम मध्ये देखील दूध वाटप करून वृद्ध नागरिकांना आधार दिला.या वेळी सल्लागार – रामचंद्र शिवगण, नांदगावकर सह खजिन – रामचंद्र शिवगण, उदय मंचेकर, रवींद्र गु उतेकर, वंश दळवी, सचिन खेडेकर, नारायण कोरगावकर, नरेश कदम, संजय डिचवलकर प्रतिक देसाई, करण पटेल,अनिल ठूकरुल, ऋत्विक चव्हाण, विराज पारकर, विश्वनाथ जाधव, अथर्व गुरव यांच्या हस्ते दूध वाटप उपक्रम पार पाडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here