सप्टेंबरमध्ये रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रचंड जाहिर सभा

eknathrao-khadse

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज दिनांक १६/८/२०२३ बुधवार दुपारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे लोकनेते विधानपरिषद गटनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई बंगला शिवराम नगर प्राथमिक चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचन्द्रजी पवार यांचा दिनांक ४/९/२०२३ जळगांव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे यासाठी नियोजन करण्यात आले. तसेच जाहिर सभा सांगर पार्क या ठिकाणी घेण्याचे ठरविण्यात आले व यासाठी पूर्ण नियोजन करण्यासाठी जळगांव जिल्हा व महानगर जळगांव यांची संयुक्त बैठक दिनांक २२/८/२०२३ दुपारी एक वाजता बोलाविण्यात आली आहे.

या बैठकीला जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब पाटील , माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर , महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला आघाडी जिल्हा अघ्यक्ष सौ वंदनाताई चौधरी, महानगर महिला जिल्हाअघ्यक्ष सौ मंगलाताई पाटील , राष्ट्रवादी युवक जिल्हाअघ्यक्ष उमेश पाटील, आदिवासी विभाग जिल्हाअघ्यक्ष इब्राहिम तडवी , समाजिक न्याय विभाग जिल्हाअघ्यक्ष अशोक सोनवणे , जामनेर तालुका अघ्यक्ष विलास राजपुत, महानगर शहर संघटक राजु मोरे , महानगर जिल्हाउपंअघ्यक्ष किरण राजपुत, मार्केट कमिटी संचालक डॉ अरुण पाटील, समाजिक न्याय उपाघ्यक्ष रमेश बारे , सदिप हिवाळे , सौरभ औचाडे , शुभम म्हस्के, राहुल टोके व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here