ठाणे (जिल्हा क्राईम रिपोर्टर प्रवीण जाधव) : कल्याण अडवली ढोकळी, देशाचा आज स्वातंत्र्य दिन संपन्न झाला. यानिमित्ताने रॉयल ड्रीम सोसायटी येथे देशाच्या सीमेवर १७ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले कल्याण ढोकळी गावचे सुपुत्र माजी सैनिक गोरख भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले..
ढोकळी येथील रॉयल ड्रीम्स सोसायटीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत, समुह गीत सादर करण्यात आले.
यावेळी सोसायटी चे अध्यक्ष योगेश खराटे सोसायटी चे उपाध्यक्ष समीर राने तसेच सोसायटी चे सर्व सदस्य सुरेंद्र जोगळे श्रीकांत मोरे.अजित मागले.अजित पाटील.दीपक पाटील.प्रसाद कोळंबे. प्रवीण जाधव,श्रीदर साळवी.भालचद्र पारब सदस्य गावामध्ये विविध पदावर कार्यरत असलेले पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक बहुसंख्येने उपस्थित होते







