चाकुचा धाक दाखवून तिघांचा १५ वर्षीय अनाथ मुलीवर अत्याचार

बलात्कार
file photo

हैदराबाद (वृत्तसंस्था) : येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली. ही घटना रविवारी मीरपेट पोलीस ठाण्याजवळ घडली, ही घटना समोर येताच नागरिकांनी कारवाईची मागणी करत निषेध व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आठ तरुणांचा एक गट पीडित मुलीच्या घरात घुसला. पीडितेला वरच्या मजल्यावर घेऊन गेलेल्या चार आरोपींपैकी तिघांनी दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी पळ काढला.

आरोपींमध्ये काही गुन्हेगार होते. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायदा, २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सखी केंद्रात पाठवले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची सात पथके तयार केली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी संशयितांनाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. रचकोंडा पोलीस आयुक्त डीएस चौहान यांनीही घटनास्थळी आणि मीरपेट पोलीस स्टेशनला भेट दिली. पीडित अल्पवयीन मुलगी दिलसुखनगर येथील कपड्याच्या दुकानात काम करते. तिला एक लहान भाऊ देखील आहे जो फ्लेक्सीचे काम करतो.

या मुलीच्या आई आणि वडिलांचा काही महिन्यांपूर्वीच मृ्तयू झाला. त्यामुळे ती मुलगी आणि तिचा भाऊ नातेवाईकांकडे राहत होते. पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ते पहाटे साडेपाच वाजता कामावरून परत आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास आठ जणांचे टोळके चाकू घेऊन आमच्या घरात घुसले. त्यांनी माझ्या बहिणीला वरच्या मजल्यावर घेऊन गेले. यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here